मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हीरक महोत्सवी वर्ष आणि लोगोचे अनावरण

Pune News : पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) आपल्या स्थापनेच्या ६०व्या वर्षात प्रवेश केला असून, २०२६-२७ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हीरक महोत्सवी वर्ष आणि लोगोचे अनावरण
सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हीरक महोत्सवी वर्ष आणि लोगोचे अनावरण


Pune News : पुणे:
केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) आपल्या स्थापनेच्या ६०व्या वर्षात प्रवेश केला असून, २०२६-२७ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या महोत्सवी वर्षाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यावेळी हीरक महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
‘सुरक्षित आणि संरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे’ ही संकल्पना लोगोच्या माध्यमातून मांडण्यात आली असून, रस्ते सुरक्षा, सुरक्षित वाहतूक, तांत्रिक नवकल्पना आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्था यावर सीआयआरटीचा विशेष भर राहणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांची भेट घेतली. पुण्यातील सीआयआरटी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी वर्षाच्या मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांना औपचारिक निमंत्रणपत्र आणि विशेष निमंत्रणिका प्रदान करण्यात आली.
शिष्टमंडळात सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह, तांत्रिक सचिवालयाचे प्रमुख शेखर ढोले, ऑटोमोटिव्ह सायबरसुरक्षेचे प्रमुख फारुख मखदूम आणि संशोधन व सल्लागार सेवेचे प्रमुख उमेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.
हीरक महोत्सवी वर्षभरात पुण्यात भव्य उद्घाटन सोहळा, वाहनांमधील परस्पर संवाद तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय कार्यशाळा, वाहन सायबर सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच वाहन उत्पादकांसाठी चाचणी व प्रमाणन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
विद्यार्थी व नवोदित व्यावसायिकांसाठी वाहन सायबर सुरक्षा कौशल्य विकास कार्यक्रम, तांत्रिक कार्यशाळा, ज्ञानमालिका, प्रवासी सुरक्षेबाबत जनजागृती अभियान आणि रस्ता सुरक्षा महिन्याचे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. तसेच सीआयआरटीच्या सहा दशकांच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
१९६७ पासून सीआयआरटीने भारताच्या रस्ते वाहतूक क्षेत्रात वाहन चाचणी, प्रमाणन, संशोधन, सल्लागार सेवा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हीरक महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, संरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत रस्ते वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी नव्या उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा