मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कोट्यावधींचा विक्रीकर थकवणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कोट्यावधींचा विक्रीकर थकवणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी: शासनाचे ५२ कोटी ६५ लाख रुपयांचे विक्रीकर थकवल्याप्रकरणी 'बिग व्हिजन वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड'च्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे घडली.

चंद्रकांत महादेव मोरे आणि एक महिला आरोपी (दोघेही रा. पाटीलनगर, चिखली) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. राज्यकर निरीक्षक सोमनाथ पोपट रणदिवे (वय ३७) यांनी मंगळवारी (दि. ५ मे) याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते २०१८ या कालावधीत संबंधित व्यापाऱ्याने विवरणपत्रे भरली होती, परंतु २०१४ ते २०१७ या कालावधीच्या कर निर्धारणासाठी ते हजर राहिले नाहीत. वारंवार नोटीस बजावूनही त्यांनी ५२ कोटी ६५ लाख ८८ हजार ८९९ रुपयांची थकबाकी भरली नाही. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिळीमकर पुढील तपास करत आहेत.

शेअर करा