मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

बंद दरवाज्यामागे अडकली जिजा… आईच्या हंबरडा ऐकून धावले अग्निशमन जवान

काही मिनिटांत चिमुकली सुखरूप बाहेर

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

बंद दरवाज्यामागे अडकली जिजा… आईच्या हंबरडा ऐकून धावले अग्निशमन जवान

काही मिनिटांत चिमुकली सुखरूप बाहेर

पिंपरी: घरभर निरागसपणे बागडणारी दीड वर्षांची जिजा अचानक बंद खोलीत अडकली आणि काही क्षणांतच आनंदी घरावर भीतीचे सावट पसरले. दरवाजा आतून लॉक झाला होता. बाहेर आई-वडिलांचा आक्रोश सुरू होता. आत चिमुकली घाबरून रडत होती. संत तुकाराम नगर परिसरातील हा थरार पाहून परिसरातील नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला. मात्र, अशा वेळी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान देवदूतासारखे धावून आले आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांनी जिजाला सुखरूप बाहेर काढत कुटुंबाला मोठा दिलासा दिला.

पिंपरीतील डी. वाय. पाटील कॉलेजशेजारी संत तुकाराम नगर येथे स्वप्निल घोटकुळे यांचे कुटुंब राहते. मंगळवारी (५ मे) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांची दीड वर्षांची मुलगी जिजा घरात खेळत होती. खेळण्याच्या नादात अचानक खोलीचा दरवाजा बंद झाला. कडी आतून अडकली. काही क्षण पालकांना काय करावे हेच सुचत नव्हते.

अग्निशमन दल तातडीने दाखल
आई दरवाजाबाहेरून जिजाला आवाज देत होती. आतून चिमुकलीचा रडण्याचा आवाज येत होता. वडिलांनी दरवाजा उघडण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, प्रत्येक क्षणासोबत भीती वाढत होती. परिसरातील नागरिकही मदतीला धावले. अखेर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. दरवाजा तोडल्यास चिमुकली घाबरण्याची शक्यता होती. त्यामुळे जवानांनी शांतपणे आणि अत्यंत कौशल्याने बचावकार्य सुरू केले. बाहेरील खिडकीतून ‘सिलिंग हुक’च्या सहाय्याने दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर दरवाजा उघडला आणि रडत असलेली जिजा जवानांच्या हातात सुरक्षित आली. बाहेर येताच आईने तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.

शेअर करा