मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bribe News : अहिल्यानगर हादरलं! महसूल अधिकाऱ्याला ₹8,000 लाच स्विकारताना रंगेहात पकडले

अहिल्यानगर | पारनेर तालुक्यातील वाडेगव्हान येथील ग्राम महसूल अधिकारी दिपक मिमाजी साठे (वय ३६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bribe News : अहिल्यानगर हादरलं! महसूल अधिकाऱ्याला ₹8,000 लाच स्विकारताना रंगेहात पकडले

अहिल्यानगर | पारनेर तालुक्यातील वाडेगव्हान येथील ग्राम महसूल अधिकारी दिपक मिमाजी साठे (वय ३६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. Ahilyanagar ACB Trap News

तक्रारदाराच्या मुलगा व पुतण्यांच्या नावावर जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने ₹10,000 लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ₹8,000 ठरली.
१७ सप्टेंबर रोजी, पंचासमक्ष लाच स्वीकारताना साठे याला सापळा कारवाईत गजाआड करण्यात आले.

▪️ तक्रार आल्यानंतर त्याच दिवशी पडताळणी झाली.
▪️ सातबारा नोंद करण्याच्या बहाण्याने आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून रक्कम मागितली.
▪️ पंचासमक्ष प्रत्यक्ष ₹8,000 रोख स्वीकारताना साठे हाती लागला.

पोलिसांची चमकदार कामगिरी

ही कारवाई पोलीस निरीक्षक राजु आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली.
पथकात पोना. चंद्रकांत काळे, शेखर वाघ, किशोर कुळधर आणि पोहेकॉ. दशस्थ लाड यांनी सहभाग घेतला.

कायदेशीर कारवाई

आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

जनतेसाठी आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आवाहन –
"जर कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल, तर त्वरित तक्रार करा. भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढ्यात प्रत्येक नागरिकाने पुढे यावे."

शेअर करा