Pune Crime : बोपखेल येथे जुन्या भांडणातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बोपखेल येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून जमाव जमवून एका तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्र आणि लोखंडी कोयत्याने डोक्यात, हातावर व पायावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले.
1 मिनिट वाचन

Pune Crime : परिसरात दहशत पसरवणाऱ्यांवर गुन्हा
Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बोपखेल येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून जमाव जमवून एका तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्र आणि लोखंडी कोयत्याने डोक्यात, हातावर व पायावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (३० ऑगस्ट) रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास बोपखेल येथील दुर्गामाता मंदिर, गणेशनगर रोडवर घडली. या प्रकरणी तुषार प्रकाश डोंगरे (२३, बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपचंद यादव (२५, बोपखेल) याला अटक करण्यात आली आहे. तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्यासह अनुज घोंगडे (२०, बोपखेल), पियुष रोकडे (२५, बोपखेल), मयंक उर्फ मड्डू आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगणमत करून फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या वेळी तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना हत्यारे दाखवून "कोणी मध्ये आले तर एकालापण सोडणार नाही" अशी धमकी आरोपींनी दिली. तसेच हवेत हत्यारे फिरवून "आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही" असे बोलून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली.दिघी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. https://maharashtramirror.com/ Pune Crime
चऱ्होली खुर्द येथे घरफोडी; दागिने आणि टीव्हीची चोरी
संशयित आरोपीला अटक
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (२८ ऑगस्ट) पहाटे साडेचार ते सोमवारी (३१ ऑगस्ट) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान चऱ्होली खुर्द येथील पद्मदर्शन पार्क, पद्मावती मंदिर पाठीमागे घडली. या प्रकरणी संग्राम उज्जैन देवकर (२६, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी रणजित अशोक भिसे (३१, रा. चऱ्होली खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घराच्या बाहेरील लोखंडी ग्रिलचे कुलूप आणि आतील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि 'हायर' कंपनीचा एलईडी टीव्ही असा एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.




