Blood Donation Camp : कै. सुजय सकपाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात भव्य रक्तदान शिबिर
पुणे, महाराष्ट्र मिरर : सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी सुजय प्रतिष्ठान–मैत्री रक्ताची यांच्या वतीने कै.
1 मिनिट वाचन

Blood Donation Camp : आयुर्वेदिक आरोग्य तपासणीसह सन्मान सोहळ्याचे आयोजन; रविवारी सदाशिव पेठेत उपक्रम
पुणे, महाराष्ट्र मिरर : सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी सुजय प्रतिष्ठान–मैत्री रक्ताची यांच्या वतीने कै. सुजय सुरेश सकपाळ यांच्या १३ व्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. Maharashtra Mirror
हा उपक्रम रविवारी (दि. ९ ऑगस्ट) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ येथे होणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिरासोबत नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी, अल्पदरात आयुर्वेदिक औषधांचे वितरण आणि मोफत कांस्यथाळी मसाजची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश ग. सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रक्तदानाचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे आणि आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन भोसले राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शिवकुमार साळुंखे (आयआरएस) तसेच सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय, सामाजिक, वैद्यकीय, चित्रपट, पत्रकारिता, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमात समाजसेवा, रक्तदान, पत्रकारिता, शिक्षण, कला, गायन आणि सामाजिक कार्य आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘सेवारत्न’ आणि ‘समाजगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे. सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश ग. सकपाळ आणि सुधीर ग. सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा: Liquor shop housing society NOC rule : सोसायटीच्या संमतीशिवाय दारूचे दुकान नाही!




