मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhusaval News : भुसावळमध्ये शरद पवार गटाला धक्का

Bhusaval News : भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला भुसावळमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

भुसावळमध्ये शरद पवार गटाला धक्का दोन माजी नगराध्यक्षांसह अकरा नगरसेवक शिंदेसेनेत
भुसावळमध्ये शरद पवार गटाला धक्का दोन माजी नगराध्यक्षांसह अकरा नगरसेवक शिंदेसेनेत

Bhusaval News : दोन माजी नगराध्यक्षांसह अकरा नगरसेवक शिंदेसेनेत


Bhusaval News : भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला भुसावळमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. दोन माजी नगराध्यक्षांसह अकरा नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Bhusaval News, https://maharashtramirror.com/
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. दोन्ही नेत्यांचा भुसावळच्या राजकारणात प्रभाव असल्याने त्यांच्या पक्षबदलाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भुसावळमध्ये शिंदेसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Bhusaval News

नगराध्यक्षपदाच्या समीकरणाची चर्चा


गायत्री भंगाळे यांच्या पक्षप्रवेशामागे भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे राजकीय समीकरण असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. २०२५च्या भुसावळ नगरपालिका निवडणुकीत गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राला समितीने अवैध ठरवल्यानंतर त्या अपात्र ठरल्या होत्या.https://maharashtramirror.com/ Bhusaval News

अकरा नगरसेवकांचाही पक्षबदल


गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्यासह भुसावळ नगरपालिकेतील शरद पवार गटाच्या अकरा नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यामध्ये गटनेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी. सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे.
याशिवाय सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागबान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान, आरिफ शेख यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला.https://maharashtramirror.com/ Bhusaval news

शिंदेंकडून नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत


पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भुसावळमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढली असून, आगामी स्थानिक राजकारणात या पक्षबदलाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

शेअर करा