मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भीमा कोरेगाव शौर्य दिन: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयस्तंभाला विनम्र अभिवादन!

Ajit Pawar At Bhima Koregaon : 208 व्या शौर्यदिनानिमित्त पेरणे फाटा येथे जनसागर; प्रशासकीय नियोजनावर अजित पवारांकडून समाधान

V
Vivek

1 मिनिट वाचन

भीमा कोरेगाव शौर्य दिन: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयस्तंभाला विनम्र अभिवादन!

Ajit Pawar At Bhima Koregaon : 208 व्या शौर्यदिनानिमित्त पेरणे फाटा येथे जनसागर; प्रशासकीय नियोजनावर अजित पवारांकडून समाधान

पुणे | आज 1 जानेवारी 2026 रोजी, कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईच्या 208 व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभाला भेट देऊन शूरवीरांना पुष्पहार अर्पण केला. "शूरवीरांचे हे बलिदान पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे," अशा शब्दांत त्यांनी ऐतिहासिक लढाईतील वीरांना आपली श्रद्धांजली वाहिली.

शासकीय मानवंदना आणि प्रशासकीय पाहणी

अजित पवार यांनी सकाळी लवकर विजयस्तंभाला भेट देऊन शासकीय मानवंदना स्वीकारली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, 'बार्टी'चे महासंचालक सुनील वारे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावर्षी सुमारे 20 लाख अनुयायी येण्याचा अंदाज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने केलेल्या पार्किंग, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांच्या नियोजनाची पवारांनी स्वतः पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

"हा शौर्याचा आणि स्वाभिमानाचा इतिहास"

अभिवादनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "हा विजयस्तंभ शौर्याचा आणि स्वाभिमानाचा गौरवशाली इतिहास सांगणारा आहे. दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाच्या वतीने मी राज्यातील जनतेच्या वतीने येथे नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असून, प्रशासन अनुयायांच्या सोयीसाठी सज्ज आहे."

सुरक्षेचा कडक पहारा

अनुयायांची वाढती गर्दी पाहता परिसरात सुरक्षिततेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.परिसरात 13,000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण पेरणे फाटा परिसरावर नजर ठेवली जात आहे. अजित पवार यांनी सर्व अनुयायांना शांततेत आणि शिस्तीत अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा