मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Beed Anti Corruption Bureau : बीडच्या नगर रचनेच्या अधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींना लाच मागितल्या प्रकरणी अटक

Beed Anti Corruption Bureau News : अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून त्याची परवानगी मिळवण्यात यावी यासाठी मागितले होते 30 हजार रुपयाची लाच

V
Vivek

2 मिनिट वाचन

Beed Crime News

Beed Anti Corruption Bureau News : अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून त्याची परवानगी मिळवण्यात यावी यासाठी मागितले होते 30 हजार रुपयाची लाच

बीड :- प्रशांत शिवाजी डोंगरे (29 वर्ष) सहाय्यक नगर रचनाकार तथा प्रभारी नगर रचनाकार बीड, निलेश सोपान पवार (29 वर्ष) अभियंता खाजगी व्यक्ती, शेख नेहाल शेख अब्दुल गणी (30 वर्ष) नोंदनिक्रत अभियंता खाजगी व्यक्ती यांना बीडच्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने अटक Beed Anti Corruption Bureau Department Arrested केली आहे.

तक्रारदार यांना अकृषिक परवानगी काढण्यासाठी 30 हजाराची लाच मागितली होती तडजोडी यांची पंधरा हजार रुपयाची लाच निश्चित झाली आणि ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Beed Anti Corruption Bureau पथकाने तीनही भ्रष्ट आरोपींना अटक केली आहे. Beed Anti Corruption Bureau Latest News

यातील तक्रारदार यांचे यळंब घाट शिवार येथील गट क्रमांक 580 अ (1) मधील 20.50 आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज BPMS पोर्टलवर खाजगी इसम निलेश पवार यांचे मार्फतीने दाखल केला होता. प्रस्ताव उपविभागीय कार्यालय बीड यांचेकडुन पुढील कार्यवाही साठी नगर रचना कार्यालय बीड यांचे कडे ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर दि 26 मार्च रोजी खाजगी इसम निलेश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे लोकसेवक प्रशांत डोंगरे यांचे करीता 30 हजार रुपयाची मागणी केली.तक्रारदार यांचे तक्ररीवरुन दि 2 एप्रिल रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम निलेश पवार यांनी लोकसेवक डोंगरे यांचे करीता 30 हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले . तसेच दिनांक 04 एप्रिल रोजी लोकसेवक प्रशांत डोंगरे यांचे विरुद्ध पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम पवार यांनी मागीतलेली 30 हजार रुपये लाच लोकसेवक डोंगरे यांचेकरीता डोंगरे यांचे सांगण्यावरूनच निलेश पवार यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लोकसेवक डोंगरे यांनी तक्रारदार यांना तडजोड अंती 15 हजार रुपयाची मागणी करुण सदर लाच रक्कम खाजगी इसम शेख नेहाल यांचेकडे देण्यास सांगितली . खाजगी इसम नेहाल याने लाच रक्कम 15 हजार स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले .निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन बीड Beed Police Station शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . Beed Anti Corruption Bureau Latest News

शेअर करा