मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातील एक

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (Bappa.org) वर आजच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातील एक परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम
‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातील एक परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम

Pune News : परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (Bappa.org) वर आजच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती उत्सव, घरच्या घरी साकारलेली मातीची मूर्ती, व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांचा उत्सव आणि विसर्जनाच्या मातीतून वृक्षसंवर्धन अशा प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

‘बाप्पा डॉट ऑर्ग’

राज्यातील घरे, स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे आणि परदेशातील भारतीय समुदायांच्या गणेशोत्सवातील आठवणींचे डिजिटल जतन या उपक्रमातून करण्यात येत आहे. छायाचित्र आणि गणेशोत्सवाशी संबंधित माहिती पोर्टलवर सादर करणाऱ्या प्रत्येक नागरिक, मंडळ अथवा मंदिर न्यासाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’ देण्यात येते. वैशिष्ट्यपूर्ण नोंदींची दररोज निवड करून शासनाच्या माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी देण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

संजय मंगलाराम यांच्या पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन


दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूळ गावी जाणाऱ्या संजय मंगलाराम यांच्या कुटुंबाने यंदा पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच गणरायाचे स्वागत केले. कुटुंबातील दोन लहान मुलींनी दैनंदिन पूजा आणि आरतीचे नेतृत्व केले. नव्या पिढीकडे परंपरेचा वारसा सोपविणाऱ्या या कौटुंबिक गणेशोत्सवाची निवड झाली आहे.https://maharashtramirror.com/ pune News

गुहागरची पारंपरिक गौरी-गणपती प्रथा


कोकणातील गुहागर परिसरात महिला डोक्यावर पारंपरिक पितळी ताटामध्ये गौरीची मूर्ती, पूजेचे नारळ आणि रानातील तेरड्याचे देठ घेऊन हिरव्यागार भातशेती व गावातील पाणवाटांमधून सामूहिकरित्या मार्गक्रमण करतात. शेती, निसर्ग, स्त्रीशक्ती आणि पूर्वजांच्या परंपरेशी नाते सांगणाऱ्या या शतकानुशतकांच्या प्रथेची निवड करण्यात आली आहे.

निकिता जे. पांचाळ यांची घरच्या घरी मातीची मूर्ती
निकिता जे. पांचाळ यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसची बाजारातील मूर्ती आणि कृत्रिम रंगांचा वापर टाळला. त्यांनी कच्च्या मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती घडवून स्वतः रंगकाम केले. पारंपरिक मातीकलेचे जतन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा त्यांचा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

व्हिएतनाममध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी जपली गणेशोत्सवाची परंपरा
महाराष्ट्रापासून दूर व्हिएतनाममध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी केली. परदेशात उत्सवासाठी आवश्यक साहित्य मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांनी स्वतः ताजे मोदक तयार केले आणि मित्रांना उत्सवात सहभागी करून घेतले. ईश्वर मनोहर बोरसे यांनी नोंदविलेली ही कथा परदेशातही भारतीय संस्कृती आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपणारी ठरली आहे.

विसर्जनाच्या मातीतून ३० हून अधिक वृक्षांचे संवर्धन
पराग नारायण शेठ गुजराथी यांच्या कुटुंबात गेल्या ६५ वर्षांपासून एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील सहा वर्षांपासून कुटुंब मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घराच्या गच्चीवरच विसर्जन करते. विसर्जनानंतरच्या मातीत रोपे लावून ती पाच फुटांपेक्षा अधिक वाढेपर्यंत त्यांचे संगोपन केले जाते. त्यानंतर ही रोपे स्थानिक नदीकाठ आणि डोंगर परिसरात लावली जातात. या माध्यमातून आतापर्यंत ३० हून अधिक वृक्ष वाढविण्यात आले आहेत.

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
राज्यातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांनी महाराष्ट्राच्या अधिकृत सांस्कृतिक डिजिटल संग्रहात सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या संकेतस्थळावर गणेशमूर्ती अथवा सजावटीचे छायाचित्र अपलोड करून परंपरा, देखावा किंवा सामाजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती नोंदवावी. माहिती यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर शासनाचे अधिकृत डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र देण्यात येईल. वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, पर्यावरणपूरक कलाकृती आणि समाजोपयोगी उपक्रम असलेल्या नोंदींची दैनंदिन पाच कथांसाठी निवड करून त्यांना शासनाच्या विविध माध्यमांवर प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा