मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : स्मार्ट क्लिनिक की रोगांना निमंत्रण?

Pune News :महत्वाचे मुद्दे *या क्लिनिकमध्ये दैनंदिन लसीकरणासाठी परिसरातील शेकडो महिला आपल्या चिमुकल्यांना घेऊन येतात *क्लिनिकमध्ये प्रवेश करताच दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य नजरेस येते *आतील बिकट परिस्थितीमुळे डॉक्टर्स आणि परिचारिका बालके व त्यांच्या मातांना बाहेर चटईवर बसवून लस देतात *तीन वर्ष

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

स्मार्ट क्लिनिक की रोगांना निमंत्रण?
स्मार्ट क्लिनिक की रोगांना निमंत्रण?

Pune News : बाणेरमधील ‘स्मार्ट क्लिनिक’मध्ये अस्वच्छता, उंदरांचा सुळसुळाट आणि नवजात बालकांना रुग्णालयाच्या दारात चटईवर लसीकरण; मनपाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

Pune News :महत्वाचे मुद्दे
*या क्लिनिकमध्ये दैनंदिन लसीकरणासाठी परिसरातील शेकडो महिला आपल्या चिमुकल्यांना घेऊन येतात
*क्लिनिकमध्ये प्रवेश करताच दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य नजरेस येते
*आतील बिकट परिस्थितीमुळे डॉक्टर्स आणि परिचारिका बालके व त्यांच्या मातांना बाहेर चटईवर बसवून लस देतात
*तीन वर्षांपासून क्लिनिकमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही
*इमारतीत साचलेल्या कचऱ्यामुळे उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहेhttps://maharashtramirror.com/ Pune News


"स्मार्ट सिटीच्या नावाखाली बाणेरमधील नागरिकांची उघडउघड दिशाभूल झाली आहे. क्लिनिकच्या या दुरावस्थेला पुणे मनपा सत्ताधारी, प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभाग पूर्णपणे जबाबदार आहेत. लवकरात लवकर या क्लिनिकची दुरुस्ती करून पाणी व अस्वच्छतेचा प्रश्न सोडवला नाही, तर मी सत्ताधारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करेन." - अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेवक

Pune News : पुणे, धनश्री ओतारी

पुण्याला ‘स्मार्ट’ बनवण्याच्या गप्पा मारणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. २०१८ मध्ये दिमाखात मोठ्या गाजावाजासह बाणेर येथे सुरू करण्यात आलेले “स्मार्ट सिटी क्लिनिक” आज स्वतःच ‘आयसीयू’मध्ये असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ज्या ठिकाणी नवजात बालके आणि गरोदर महिलांना स्वच्छ व सुरक्षित आरोग्य सेवा मिळणे अपेक्षित आहे, तिथे चक्क रुग्णालयाच्या दरवाज्यात चटई अंथरून उघड्यावर लहान मुलांचे लसीकरण करावे लागत आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

नवजात बालकांना उघड्यावर लसीकरण


बाणेर येथील या स्मार्ट क्लिनिकमध्ये दैनंदिन लसीकरणासाठी परिसरातील शेकडो महिला आपल्या चिमुकल्यांना घेऊन येतात. मात्र, क्लिनिकच्या आत प्रवेश करताच दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. आतील बिकट परिस्थितीमुळे क्लिनिकमधील डॉक्टर्स आणि परिचारिकांना नाईलाजास्तव लहान बालके व त्यांच्या मातांना बाहेर चटईवर बसवून लस द्यावी लागत आहे.

एकीकडे पुणे शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो शहर बनवण्याचे दावे सत्ताधाऱ्यांकडून केले जात असताना, दुसरीकडे उपनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची ही दयनीय अवस्था पाहून "पुणे महापालिका शहराचा विकास करण्याऐवजी त्याला पुन्हा ग्रामपंचायतीच्या दिशेने तर घेऊन जात नाही ना?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उंदरांचा सुळसुळाट अन् पाण्याची टंचाई


गेल्या २ ते ३ वर्षांपासून या क्लिनिकमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. पावसाळ्यात व एरवीही शेडच्या पत्र्यांतून होणाऱ्या गळतीमुळे आरोग्य केंद्रात ठिकठिकाणी पाणी साचते. इमारतीत साचलेला कचरा, उंदीर आणि घुशींचा वाढता सुळसुळाट यामुळे आरोग्य केंद्र हेच रोगांचे आगर बनले आहे. उपचारासाठी आलेला रुग्ण इथे बरा होऊन घरी जाण्याऐवजी येथील घाणीमुळे अधिक आजारी पडण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

तर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा


या सर्व धक्कादायक परिस्थितीवर नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

तातडीने दुरुस्ती करण्याची रुग्णालयाच्या नातेवाईकांची मागणी


पुण्यासारख्या प्रगत शहरात नवजात बालकांना लसीकरणासाठी रस्त्यावर किंवा दारात बसवावे लागणे ही प्रशासकीय नाकर्तेपणाची पराकाष्ठा आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकाराची तत्काळ गंभीर दखल घेऊन क्लिनिकची डागडुजी करावी, स्वच्छता राखावी आणि योग्य बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक रहिवासी आणि नातेवाईकांकडून केली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा