मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा विलगीकरणाचे ऑडिट करून दोषींवर कारवाई होणार: सिद्धेश कदम

'रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६' या परिषदेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा विलगीकरणाचे ऑडिट करून दोषींवर कारवाई होणार: सिद्धेश कदम

'रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६' या परिषदेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

"केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन सुधारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या गृहनिर्माण संकुलात अशी यंत्रणा कार्यान्वित आहे तिचे पालन केले जात नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करून प्रदूषण नियंत्रणाकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आग्रही पाऊल उचलले." - सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पुणे: राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा व गृहनिर्माण संकुलातील कचरा विलगीकरण याचे ऑडिट केले जात असून दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांनी केली.

सोमवारी येथे प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया आणि भारत रिसायकलिंग शो यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६' या परिषदेसाठी श्री सिद्धेश कदम प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषण नियंत्रणाबाबत भूमिका स्पष्ट केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या गृह निर्माण संकुलातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे नियमित चालवली जातात की नाही त्याचबरोबर या गृह संकुलातील कचरा विलगीकरण केले जात आहे अथवा नाही याची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यस्तरीय ऑडिट केले जात आहे.

नियंत्रण मंडळाचे आग्रही पाऊल
राज्यातील मोठ्या शहरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न हा जल प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरत आहे तर कचरा विलगीकरण न केल्याने मातीचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. म्हणून केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन सुधारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या गृहनिर्माण संकुलात अशी यंत्रणा कार्यान्वित आहे तिचे पालन केले जात नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करून प्रदूषण नियंत्रणाकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आग्रही पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.

आरएमसी प्लांटची देखील तपासणी
पुणे शहरातील आरएमसी प्लांटची देखील अशाच पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून आरएमसी प्लांटच्या माध्यमातून हवा प्रदूषण होणार नाही याकरता आरएमसी प्लांट उद्योगांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि मंडळांने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी आरएमसी प्लांट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केले.

तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी तत्परता
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणासाठी फक्त दंडात्मक कारवाई करण्यावरच भर देत नसून याबाबत राज्यातील औद्योगिक आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था याना योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच तत्परता दाखवत असते याचा देखील पुनरुच्चार आज सिद्धेश कदम यांनी केला.

सर्क्युलर इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना
प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन २०२६च्या निमित्ताने राज्यभरात मुंबई, पुणे , नाशिक, नागपूर , आणि रत्नागिरी अशा शहरात प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन परिषदा भरवण्यात येणार असून वेस्ट रिसायकलिंगच्या माध्यमातून सर्क्युलर इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि यात नवउद्योजक तरुणांचा लक्षणीय वाढता सहभाग असेल असा विश्वास देखील त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने व्यक्त केला.

पुणे शहरातील मुळा मुठा नदीच्या एका टप्प्याचे तांत्रिक सर्वेक्षण हे न्यायालयीन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महानगरपालिका आणि जलसंधारण विभाग संयुक्तपणे करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण नियंत्रणासाठी धोरणात्मक कामकाज करीत असून त्या साठी लोक सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचं सिद्धेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Action will be taken against the culprits after auditing the sewage treatment plants and waste segregation in large housing complexes in the state: Siddhesh Kadam

शेअर करा