भोसरी ते नाशिक फाटा रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण अपघात
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला
PG
Prashik Ghaste
1 मिनिट वाचन

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी नाशिक फाटा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण अपघात झाला. अपघातामुळे टेम्पो ट्रॅव्हलर बस महामार्गावरून रस्त्याच्या कडेला पलटी झाली आहे. अपघातावेळी बस चालकाव्यतिरिक्त बसमध्ये दुसरा कोणताही प्रवासी नसल्याने मोठी जीवित हानी टळली आहे. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे भोसरी नाशिक फाटा मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. खाजगी क्रेनच्या सहाय्याने वाहतूक पोलीस सध्या टेम्पो ट्रॅव्हलर बस काढण्याचा प्रयत्न करत आहेत.




