मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Tuljapur News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Tuljapur News : तुळजापूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Tuljapur News : तुळजापूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, राज्यातील मोठ्या भागावर दुष्काळाचे सावट असल्याचे त्यांनी म्हटले.https://maharashtramirror.com/ Tuljapur News

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील आष्टा कासार तसेच तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत त्यांच्या खात्यांपर्यंत पोहोचविण्याची मागणी केली.https://maharashtramirror.com/ Tuljapur News

कर्जवसुलीच्या नोटिसा थांबविण्याची मागणी


दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ठाकरे यांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीच्या नोटिसा थांबवाव्यात, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णपणे माफ करावी, असे ते म्हणाले.दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याची स्पष्ट माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘अतिवृष्टीची मदत जाहीर झाली, मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही’

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली होती. मात्र, ही मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.“मुख्यमंत्र्यांनी मदतीच्या घोषणा केल्या आहेत; मात्र आजपासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पोहोचणार, हे महत्त्वाचे आहे,” असे ठाकरे म्हणाले. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीला विलंब न करता ती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा