मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कोथरुडमध्ये तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

केळेवाडी परिसरात जुन्या वादातून चौघांचा राडा

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कोथरुडमध्ये तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

केळेवाडी परिसरात जुन्या वादातून चौघांचा राडा

पुणे: कोथरुडमधील पौड रोडवरील केळेवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. जिवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, कोथरुड पोलिसांनी चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पौड रोड, कोथरुड येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), १८९ (२), १९१ (२), १९० सह शस्त्र कायदा कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

वसंतनगर परिसरात गाठून हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ३) रात्री आठच्या सुमारास फिर्यादीचे पती कोथरुडमधील केळेवाडी येथील वसंतनगर भागात खडकेश्वर मित्रमंडळाजवळ थांबले होते. यावेळी तिथे आलेल्या चार अज्ञात आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

डोक्यात आणि हातावर कोयत्याचे वार
आरोपींनी फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असतानाच, एकाने स्वतःजवळील कोयत्याने त्यांच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार केले. जिवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या या वारामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरडाओरडा झाल्यामुळे आणि लोकांची गर्दी जमू लागल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. कोथरुड पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा