मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

वाघोली येथे एक तडीपार आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

आज रोजी गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार नामे श्यामकांत विष्णू सातव वय ४० रा.

V
Vivek

1 मिनिट वाचन

वाघोली येथे एक तडीपार आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

आज रोजी गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार नामे श्यामकांत विष्णू सातव वय ४० रा. डोमखेल वस्ती, आव्हाळवाडी, ता हवेली, जि पुणे येथे राहते घरी आला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यास ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यास तडीपार आदेश क्र. 38/2024 नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 (1),(अ)(ब) प्रमाणे दि. 12/08/2024 रोजी पासुन दीड वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले होते. आज रोजी तो मिळून आल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास करणेकामी वाघोली पोलीस स्टेशनचे स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.

हेही वाचा: अवैधरित्या नवी मुंबईत तब्बल 30 वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी कुटुंबाला अटक

शेअर करा