मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

'तुला लय माज आहे का?' असे म्हणत तरुणावर रोखले पिस्तुल

दोन अल्पवयीनांसहित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

'तुला लय माज आहे का?' असे म्हणत तरुणावर रोखले पिस्तुल

दोन अल्पवयीनांसहित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी: मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाला जुन्या ओळखीच्या चौघांनी गाठून जिवे मारण्याची धमकी दिली. "तुला लय माज आहे का, अमोल भोसलेसोबत का फिरतोस?" असे म्हणत एकाने कमरेचे पिस्तुल काढून तरुणावर रोखले. ही घटना जुनी सांगवी परिसरातील दत्‍त आश्रम रोड, नवीन पुलाजवळ शुक्रवारी (८ मे) रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास घडली.

अनिकेत देवेंद्र गायकवाड (२४, जयमाला नगर, जुनी सांगवी) यांनी शनिवारी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन विधीसंघर्षीत बालकांसह अन्य दोन अशा एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी अनिकेत हे त्यांचे मित्र दत्ता लांडगे आणि पवन अवचरे यांच्यासह दत्त आश्रम रोडवरील नवीन पुलाजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हावरून चार आरोपी तिथे आले. त्‍यातील एका आरोपीने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तुल काढले आणि फिर्यादीच्या दिशेने रोखले. "कारे तुला लय माज आहे काय, तू अमोल भोसले बरोबर का फिरतोस, आज तुला खल्लासच करतो" अशी धमकी देत सर्वांनी शिवीगाळ केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा