मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
अजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसानसण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहनलंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतकष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड!स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते : प्रा विशाल पतंगेलग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने १,४०,००० रुपयांवर, खरेदीची हीच योग्य वेळ?

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, संकटात शिवसेना ठामपणे पाठीशी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तातडीची मदत; यापुढेही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन देत सरकार आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले. शिवसैनिक सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना आणि दुःख समजून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे. सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जिथे मदतीची गरज भासेल तिथे शिवसेना पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पाच हजारांची तातडीची मदत

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असा शब्द आम्ही दिला होता आणि तो पाळला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तातडीची अग्रिम मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळीचा शिधाही देण्यात आला. ही केवळ सुरुवातीची मदत असून, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या १२ सवलती आणि अन्य शासकीय मदतीचाही लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

राजकारण नको, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा

शेतकरी संकटात असताना या विषयावर राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन त्यांना मदत करणे आवश्यक आहे. सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि शिवसैनिकांनी ज्या भागात शेतकरी संकटात आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करावी, असे आवाहनही शिंदे यांनी केले. विरोधकांनी मदतीच्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे ते म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसैनिक करत आहेत. 'जिथे संकट, तिथे शिवसेना' ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर