मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
अजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसानसण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहनलंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतकष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड!स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते : प्रा विशाल पतंगेलग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने १,४०,००० रुपयांवर, खरेदीची हीच योग्य वेळ?

सण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहन

भाऊबीजेनिमित्त आरपीआयच्या ख्रिश्चन आघाडीतर्फे ५०० महिलांना साडीवाटप

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

सण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहन
भाऊबीजेनिमित्त आरपीआयच्या ख्रिश्चन आघाडीतर्फे ५०० महिलांना साडीवाटप

पुणे : दीपावलीचा सण अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो, तर भाऊबीजेसारखा सण हेवेदावे विसरून परस्परांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश देतो. सण-उत्सवांचा योग्य बोध घेऊन समाजातील विद्वेष दूर करण्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश महासचिव बाळासाहेब जानराव यांनी केले.

भाऊबीजेनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या ख्रिश्चन आघाडीच्या वतीने घोरपडी गाव येथील संविधान चौकात सुमारे ५०० महिला भगिनींना साडीवाटप करण्यात आले. या कार्यक्रमात जानराव बोलत होते. त्यांच्या हस्ते तसेच पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

जानराव म्हणाले, सध्याच्या काळात विविध कारणांमुळे समाजातील दरी रुंदावत आहे. व्यक्तिगत प्रगतीसोबतच सामाजिक प्रगती साधायची असेल, तर परस्परांमधील संघर्ष टाळून एकोप्याने पुढे जाण्याची गरज आहे. दीपावली आणि भाऊबीजेसारखे सण सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देतात. या सणांमधून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांनी केले.

यावेळी पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर उपाध्यक्ष अर्जुन अल्हाट, महिला अध्यक्षा डॉर्थी थॉमस, राजश्री मुदलियार, वडगाव शेरी महिला अध्यक्षा चांदणी गायकवाड, मुंढवा विभागाध्यक्ष किरण सूर्यवंशी, घोरपडी गाव अध्यक्ष विनेश पिल्ले, स्टॅन्ली नाथन, दिलीप जोसेफ, ॲजलेंस अँथोनी, येशू दोरास्वामी, ॲग्निस एंथोनी, रवी मुदलियार, सिरीयल मरियान, अंजली पिल्ले, जॉनसिंग मुनवर, राजू मोजेस, सेल्वराज पिल्ले, विनोद रंगा, आबा गायकवाड, सचिन डोळस, शंकर गायकवाड, प्रकाश अल्हाट आदी उपस्थित होते.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper