मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
१३ वर्षे जुने प्रकरण, पण शिक्षा नाही३१ हजार फुटांवर १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला; पुणे विमानतळावर इमर्जन्सीअजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा: मुख्यमंत्रीमृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यास भारताचा विरोधलातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का; धीरज देशमुखांच्या सहकार पॅनलची बाजीसूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजय

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; भाजपच्या माघारीने अनिल पाटलांच्या पत्नी बिनविरोध

जयश्री पाटील यांची निवड निश्चित; मंत्री गिरीश महाजन यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

जळगाव

जळगाव, महाराष्ट्र मिरर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असतानाच निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला.

अमळनेर तालुक्यातील मनव विकास सोसायटी मतदारसंघातून जयश्री अनिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. विशेष म्हणजे, महायुतीमधील भाजपच्या उमेदवाराने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारासाठी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा कायम असताना ही माघार महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात भाजपला १०, शिवसेना शिंदे गटाला ७, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

दुसरीकडे, जामनेर तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे रघुनाथ सखाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळण्यात आला आहे.

आतापर्यंत जिल्हा बँकेत शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक अशा एकूण चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या अंतिम दिवस असल्याने आणखी कोण माघार घेणार आणि महायुतीचे जागावाटप कसे निश्चित होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर