मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
अजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढीसाठी मोठे विद्यापीठ : अमित शाह यांचे गौरवोद्गार; निधनाने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसानसण-उत्सवांतून सामाजिक विद्वेष दूर करण्याची प्रेरणा घ्यावी : बाळासाहेब जानराव यांचे आवाहनलंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतकष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड!स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते : प्रा विशाल पतंगेलग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने १,४०,००० रुपयांवर, खरेदीची हीच योग्य वेळ?

कष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड!

उपमहापौर परशुराम वाडेकर व सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून १५ वर्षांपासून दिवाळी स्नेहभेट उपक्रम

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

कष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड!
उपमहापौर परशुराम वाडेकर व सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून १५ वर्षांपासून दिवाळी स्नेहभेट उपक्रम

पुणे : समाजाच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, रिक्षाचालक आणि विद्युत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम बोपोडी येथे राबविण्यात आला. विद्यमान उपमहापौर परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर आणि मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी स्नेहभेट समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बोपोडी येथील सम्यक विहार व विकास केंद्र येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.

गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही औंध क्षेत्रीय कार्यालय, बाबुराव शेवाळे हॉस्पिटल, चिखलवाडी आरोग्य केंद्र, बोपोडी आरोग्य केंद्र आणि संजय गांधी रुग्णालय आरोग्य कोठी येथील सफाई कर्मचारी, मुकादम, तसेच प्रभागातील रिक्षाचालक आणि विद्युत कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी सनदी अधिकारी शरद जाधव आणि पुणे शहर आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उद्धव राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी आरोग्य मुकादम सिद्धार्थ बागुल, सुरेश गायकवाड, शेलार, अनिल शिंदे, आरोग्य निरीक्षक योगेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी, रिक्षाचालक आणि विद्युत कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अविनाश कदम, कार्याध्यक्ष भीमा गायकवाड, उपाध्यक्ष निलेश वाघमारे, सचिव राजेंद्र शिंदे, सचिन चव्हाण, माजी पुणे युवक जिल्हाध्यक्ष उमेश कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष ज्वेल अँथोनी, भीमराव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश वाघमारे, राजेंद्र शिंदे, अनेश रोकडे, बाळासाहेब मोरे, सादिकभाई शेख, बापू रणदिवे, कैलास कांबळे, विलास जाधव, रुपेश पिल्ले, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष सुरेंद्र आठवले, नंदाताई निकाळजे, कलावती भंडारे, शिवाअण्णा पिल्ले आणि विनीत चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश जावीर यांनी केले, तर छायाचित्रण ज्येष्ठ छायाचित्रकार विजय सोनीगरा यांनी केले.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper