मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
तीन आमदारांच्या हत्येच्या कटाचा आरोप; संजय राऊतांच्या दाव्यावर शिंदे गटाचे प्रत्युत्तरपश्चिम बंगालचे नाव बदलण्याच्या हालचाली; ‘पश्चिम बंगा’ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडणारयुट्यूबर ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट; दिल्लीतील साकेत न्यायालयाचा आदेशगोधरा रेल्वे अग्निकांडातील दोषीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी; बाजारात भाव स्थिर

फंक्शन, विवाह सोहळ्यांसाठी झेंडू, गुलाबासह विविध फुलांना पसंती; आगामी काळात मागणी वाढण्याचा अंदाज

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनिट वाचन

फुले
फुले

पुणे, महाराष्ट्र मिरर : लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने बाजारपेठेत सजावटीच्या फुलांना मागणी वाढू लागली आहे. विवाह सोहळे, साखरपुडा, रिसेप्शन तसेच विविध कौटुंबिक कार्यक्रमांच्या सजावटीसाठी फुलांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे पुण्याच्या मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात सजावटीच्या फुलांची खरेदी सुरू झाली आहे. राज्यासह परराज्यांतूनही सजावटीच्या फुलांना मागणी येत आहे.

दिवाळीनंतर सुट्या फुलांची मागणी तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे या फुलांची आवकही कमी होत आहे. मात्र, लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांच्या बाजाराला आधार मिळाला आहे. विवाह मंडप, स्टेज, प्रवेशद्वार, वाहनांची सजावट तसेच हॉलच्या सुशोभीकरणासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला जात आहे. आगामी काळात लग्नसराईला वेग येणार असल्याने सजावटीच्या फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या बाजारातील आवक आणि मागणी यांचा समतोल असल्याने सुट्या व सजावटीच्या फुलांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. अशी माहिती मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर