लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी; बाजारात भाव स्थिर
फंक्शन, विवाह सोहळ्यांसाठी झेंडू, गुलाबासह विविध फुलांना पसंती; आगामी काळात मागणी वाढण्याचा अंदाज
1 મિનિટ વાંચન

पुणे, महाराष्ट्र मिरर : लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने बाजारपेठेत सजावटीच्या फुलांना मागणी वाढू लागली आहे. विवाह सोहळे, साखरपुडा, रिसेप्शन तसेच विविध कौटुंबिक कार्यक्रमांच्या सजावटीसाठी फुलांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे पुण्याच्या मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात सजावटीच्या फुलांची खरेदी सुरू झाली आहे. राज्यासह परराज्यांतूनही सजावटीच्या फुलांना मागणी येत आहे.
दिवाळीनंतर सुट्या फुलांची मागणी तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे या फुलांची आवकही कमी होत आहे. मात्र, लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांच्या बाजाराला आधार मिळाला आहे. विवाह मंडप, स्टेज, प्रवेशद्वार, वाहनांची सजावट तसेच हॉलच्या सुशोभीकरणासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला जात आहे. आगामी काळात लग्नसराईला वेग येणार असल्याने सजावटीच्या फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या बाजारातील आवक आणि मागणी यांचा समतोल असल्याने सुट्या व सजावटीच्या फुलांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. अशी माहिती मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

મહારાષ્ટ્ર મિરર
