मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सपना चौधरी यांचा घटस्फोटासाठी अर्ज; ‘नाते टिकणारच नव्हते’हनुमान म्हणजे भारताचे ‘आयर्न मॅन’ : नमित मल्होत्राॲक्टिंग क्लासमध्ये झाडू मारताना रडकुंडीला आली होती दीपिकारामायणची जगभरात १,७०० कोटींची झेपशंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवडमहिला फुटबॉल विश्वचषकाच्या यजमानपदावर अमेरिका आणि ब्रिटनची बाजी!

महिन्याभरात सोन्याचे दर तब्बल १८,५३० रुपयांनी घसरले

२४ कॅरेट सोन्यात १३ टक्क्यांची घट; अमेरिकेतील महागाई, रोजगार आणि व्याजदराच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

महिन्याभरात सोन्याचे दर तब्बल १८,५३० रुपयांनी घसरले
२४ कॅरेट सोन्यात १३ टक्क्यांची घट; अमेरिकेतील महागाई, रोजगार आणि व्याजदराच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

नवी दिल्ली : गेल्या महिनाभरात सोने आणि चांदीच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात काल पुन्हा वाढ नोंदवण्यात आल्याने गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी महिन्याभरातील मोठी घसरण अद्याप कायम आहे. अवघ्या एका महिन्यात १० ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल १८ हजार ५३० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे सोने खरेदीची तयारी करणारे ग्राहक आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी सध्याची परिस्थिती महत्त्वाची ठरत आहे.

देशांतर्गत बाजारातील आकडेवारीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ४५ हजार ४३० रुपये होता. २३ नोव्हेंबरपर्यंत हा भाव घसरून १ लाख २६ हजार ९०० रुपयांवर आला. म्हणजेच महिनाभरात सोन्याच्या किमतीत सुमारे १३ टक्क्यांची घट झाली आहे. या घसरणीमुळे खरेदीदारांना तुलनेने कमी किमतीत सोने घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

अमेरिकेतील आर्थिक निर्णय ठरणार निर्णायक

आगामी काळात सोन्याच्या दरांची दिशा अमेरिकेतील महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत अमेरिकेतील महागाई, रोजगार आणि व्याजदरांशी संबंधित आकडेवारी जाहीर होणार आहे. या आकडेवारीच्या आधारे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील व्याजदरांबाबत काय भूमिका घेते, याकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे.

व्याजदरांमधील संभाव्य बदलांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या घसरणीनंतरही दर आणखी कमी होतील की पुन्हा वाढतील, याबाबत अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवण्याऐवजी बाजारातील पुढील घडामोडींचा अभ्यास करून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper