मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
शासनाची २८ पदांची भरती योजना बारगळली; नोंदणी विभागाच्या २३ जागा अद्यापही रिक्तनेपाळमधील पहिल्या सौराहा ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंची नेत्र दीपक कामगिरी.५० लाख देऊनही मॅरेथॉन पत्रिकेतून महापालिकेचे नाव आणि लोगो गायब१३ वर्षे जुने प्रकरण, पण शिक्षा नाही३१ हजार फुटांवर १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला; पुणे विमानतळावर इमर्जन्सीअजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा: मुख्यमंत्री

नेपाळमधील पहिल्या सौराहा ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंची नेत्र दीपक कामगिरी.

नेपाळमधील चितवन येथील सौराहा येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सौराहा ओपन

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नेपाळमधील पहिल्या सौराहा ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंची नेत्र दीपक कामगिरी.
नेपाळमधील चितवन येथील सौराहा येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सौराहा ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील भोसलेज तायक्वांदो आणि योधी तायक्वांदोच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

पुणे : नेपाळमधील चितवन येथील सौराहा येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सौराहा ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील भोसलेज तायक्वांदो आणि योधी तायक्वांदोच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेसाठी संघाचे नेतृत्व ग्रँडमास्टर चंद्रकांत भोसले यांनी केले. त्यांच्यासोबत मास्टर राजेश पुजारी, मास्टर भार्गव भोसले आणि मास्टर स्वाती खुर्जेकर यांनी संघाला मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत खेळाडूंनी आत्मविश्वासासह शिस्तीने आणि जिद्दीने उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करत एकूण सहा पदके पटकावली. तायक्वांदो खेळाचा प्रसार, गुणवत्तापूर्ण खेळाडूंची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावण्याच्या दिशेने हे यश एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

पदक विजेते खेळाडू

वेदिका राजेश पुजारी आणि झेना सहनी यांनी सुवर्णपदक, देवकी किरण परदेशी, यश गुल्लापल्ली, अमेय शिंदे यांनी रौप्यपदक आणि निखिल सागर दामले याने कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि परदेशातील खेळाडूंसोबत स्पर्धात्मक अनुभव मिळविण्याची उत्तम संधी मिळाल्याची भावना ग्रँडमास्टर चंद्रकांत भोसले आणि मास्टर राजेश पुजारी यांनी व्यक्त केली.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper