मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
१३ वर्षे जुने प्रकरण, पण शिक्षा नाही३१ हजार फुटांवर १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला; पुणे विमानतळावर इमर्जन्सीअजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा: मुख्यमंत्रीमृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यास भारताचा विरोधलातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का; धीरज देशमुखांच्या सहकार पॅनलची बाजीसूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजय

३१ हजार फुटांवर १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला; पुणे विमानतळावर इमर्जन्सी

पुण्याहून इंडिगो विमानाचे गुवाहाटीकडे उड्डाण, लँडिंग गिअर न मिटल्याने वैमानिकासमोर मोठं आव्हान

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

३१ हजार फुटांवर १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला; पुणे विमानतळावर इमर्जन्सी
पुण्याहून इंडिगो विमानाचे गुवाहाटीकडे उड्डाण, लँडिंग गिअर न मिटल्याने वैमानिकासमोर मोठं आव्हान

पुणे: कल्पना करा, तुम्ही विमानात बसला आहात आणि हजारो फूट उंचीवरून प्रवास करत आहात. अचानक विमानाचं लँडिंग गिअर टेकऑफनंतर आत गेलंच नसल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्याचं मोठं आव्हान वैमानिकासमोर उभं राहतं. असाच थरार पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात पाहायला मिळाला. विमानातील १९२ प्रवाशांचा जीव काही काळासाठी टांगणीला लागला होता. मात्र, पुणे विमानतळ प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

टेकऑफनंतर लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड; पुणे विमानतळावर फुल इमर्जन्सी घोषित

पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या (6E 0623 VT-IZE) या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं. विमानाचं लँडिंग गिअर टेकऑफनंतर आत न गेल्याने ते बाहेरच राहिलं. ही बाब लक्षात येताच वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली. विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून एकूण १९२ जण होते. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता पुणे विमानतळ प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. भारतीय हवाई दलाकडून पुणे विमानतळावर फुल इमर्जन्सी घोषित करण्यात आली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या.

लो पासनंतर विमानाचं सुरक्षित लँडिंग; १९२ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला

विमानाच्या लँडिंग गिअरची नेमकी स्थिती तपासण्यासाठी वैमानिकाने धावपट्टीवरून लो पास घेतला. म्हणजेच विमान धावपट्टीजवळून कमी उंचीवरून नेण्यात आलं, जेणेकरून लँडिंग गिअरची स्थिती तपासता येईल. त्यानंतर सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी विमानाचं पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतरही खबरदारी म्हणून तीन अग्निशमन वाहनं आणि दोन रुग्णवाहिकांच्या सुरक्षेत विमानाला बे क्रमांक ७ वर हलवण्यात आलं.

विमान सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी फुल इमर्जन्सी मागे घेण्यात आली. त्यानंतर एरोब्रिज जोडून सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. या संपूर्ण घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. विमानातील सर्व १९२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी गुवाहाटीला पोहोचवण्याकरिता इंडिगोकडून बंगळुरूहून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत केवळ एक प्रवासी बचावला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जयपूर विमानतळावरही एअर इंडियाच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं. आता पुणे विमानतळावर इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मात्र, पुण्यातील या घटनेत पुणे विमानतळ प्रशासन, भारतीय हवाई दल, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि इंडिगोच्या समन्वयातून आपत्कालीन परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यात आली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विमानातील १९२ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आणि एक मोठा अनर्थ टळला.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper