मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
राज ठाकरेंचा भाजपला सत्तेतून पायउतार होण्याचा इशारा!Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!

तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन संतापले

हातात झाडू घेत स्वतः केली स्वच्छता

सक
स्मिता कुलकर्णी

1 मिनिट वाचन

तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन संतापले
गिरीश महाजन

जळगाव : शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि शिस्त राखण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असतानाही कार्यालयांच्या परिसरात अस्वच्छता असल्याचे चित्र समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयात असाच प्रकार पाहायला मिळाला. कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन चांगलेच संतापले. त्यांनी थेट हातात झाडू घेत स्वतःच कार्यालयाची स्वच्छता केली.

पत्रकार परिषदेसाठी मंत्री गिरीश महाजन तहसील कार्यालयात पोहोचले असता, त्यांना परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ, भिंतींवर जाळी आणि कोळीष्टके साचल्याचे दिसून आले. कार्यालयातील अस्वच्छतेमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, कार्यालयातील स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्याही आढळून आल्या. या प्रकारामुळे महाजन यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

कार्यालयातील अस्वच्छता पाहून केवळ नाराजी व्यक्त न करता महाजन यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता करण्यास सुरुवात केली. शासकीय कार्यालयात अशा प्रकारे अस्वच्छता आढळणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

शासकीय कार्यालये ही नागरिकांसाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे तेथील स्वच्छता, शिस्त आणि कामकाजाचा दर्जा राखण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. या घटनेनंतर जामनेर तहसील कार्यालयातील स्वच्छतेचा प्रश्न चर्चेत आला असून, वरिष्ठ अधिकारी याबाबत काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

शेअर करा