मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
राज ठाकरेंचा भाजपला सत्तेतून पायउतार होण्याचा इशारा!Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर मध्यरात्री राडा; दगडफेक आणि बाटल्या फेकल्या

सुरक्षा रक्षकांशी झटापट; तीन आरोपींना अटक, पोलीस प्रशासनावर मंत्र्यांचा संताप

सक
स्मिता कुलकर्णी

1 मिनिट वाचन

दगडफेक आणि बाटल्या फेकल्या
संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी परिसरातील निवासस्थानाबाहेर गुरुवारी मध्यरात्री गोंधळाची घटना घडली. मद्यपान करत बसलेल्या तरुणांना सुरक्षा रक्षकांनी हटकल्याच्या रागातून त्यांनी बंगल्याच्या दिशेने दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा ते बाराच्या सुमारास काही तरुण मंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस मद्यपान करत बसले होते. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, यावरून तरुणांनी वाद घालत सुरक्षा रक्षकांशी झटापट केली. त्यानंतर बंगल्याच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न करत दगड आणि रिकाम्या काचेच्या बाटल्या फेकल्या.

या घटनेत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी कारवाई करत रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे या तिघांना अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलीस आयुक्तांचा फोन बंद होता, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी वेळेत घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा आरोप त्यांनी केला. एका पालकमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर अशी घटना घडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या घटनेमुळे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

शेअर करा