मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पुणेकरांवर पडणार पाणीकपातीचा बोजा?मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंदचार वर्षांनंतर पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत अव्वल ५ मध्येपाकिस्तानला हरवत भारताचा ऐतिहासिक विजय पटकावले चॅम्पियनशिपचे विजेतेपदरोलर स्केटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्णभरारीआयपीएलमधील धोनीची खेळाडू म्हणून एक्झिट; आता चेन्नई सुपर किंग्जच्या मार्गदर्शकाची जबाबदारी

मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

पुणे, महाराष्ट्र मिरर : मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने डेक्कन परिसरातून अटक केली. मनीष शांताराम गंगावणे (वय ३०, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मनीष गंगावणे हा पाहिजे आरोपी होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून त्याचा शोध सुरू होता.

१८ नोव्हेंबर २०२६ रोजी युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे आणि पथक नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिमण आणि योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मनिष गंगावणे डेक्कन परिसरातील चौपाटीवर आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शेलारमामा चौकाजवळ सापळा रचून बसलेल्या मनीष गंगावणे याला शिताफीने ताब्यात घेतले.

वारजे पोलीस ठाण्यात मनीष गंगावणेविरुद्ध भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला कोथरूड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिमण, अतुल साठे, विपुल गायकवाड, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे आणि आशिष राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper