मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटनअजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर; सुप्रिया सुळे भावुककेरळ भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; पद्मिनी थॉमस यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये घरवापसी करणारभाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत महिलांना ठेंगा!लक्ष्मी रोडवरील अतिक्रमणविरोधी कारवाईला तुर्तास ब्रेक

डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाला पाच लाखांचा गंडा

मुंबई एटीएसचा पोलीस अधिकारी असल्याची बतावणी

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाला पाच लाखांचा गंडा
मुंबई एटीएसचा पोलीस अधिकारी असल्याची बतावणी

पुणे, महाराष्ट्र मिरर : मुंबई एटीएसमधून पोलीस निरीक्षक बोलत असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली औंध येथील ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे चौकशीचा धाक दाखवत आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यांची माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑनलाइन माध्यमातून हा प्रकार घडला. एका मोबाइलधारकाने फिर्यादींना फोन करून आपण मुंबई एटीएसमधील पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करून त्यांची चौकशी सुरू असल्याचे भासवले.

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आरोपीने फिर्यादींना तपासासंदर्भात कोणालाही काही सांगू नये, अशी धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवली आणि त्यातून पाच लाख रुपये उकळले.

याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३१९(२), ३१८(४), २०४, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइलधारक आणि विविध बँक खात्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शीतल जाधव करीत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper