पीएमपी बसच्या दरवाज्यातून खाली पडून महिला प्रवासी जखमी
बसचा भरधाव वेग आणि अचानक ब्रेक दाबल्याने घडली घटना
1 मिनिट वाचन

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : चालकाने बसचा दरवाजा उघडा ठेवून भरधाव वेगाने बस चालवल्याने आणि अचानक ब्रेक दाबल्याने चालत्या बसमधून खाली पडून महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता थोरल्या पादूका मंदिराजवळ, वडमुखवाडी येथे घडली.
या प्रकरणी जखमी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी बसवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बसचालकाने बसचा दरवाजा उघडाच ठेवून वाहन अत्यंत भरधाव वेगाने चालवले. त्यानंतर अचानक बसचा ब्रेक दाबल्यामुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या फिर्यादी महिला तोल जाऊन दरवाज्यावाटे थेट खाली रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताच्या खुब्याला, डोक्याच्या मागील बाजूस तसेच गुडघ्याला तीव्र मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दिघी पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




