मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
वारजे परिसरात गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाईरोहित पवारांना अजितदादांची जागा घेण्याची घाई; हसन मुश्रीफ यांचा टोला, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे केले समर्थनतीन आमदारांच्या हत्येच्या कटाचा आरोप; संजय राऊतांच्या दाव्यावर शिंदे गटाचे प्रत्युत्तरपश्चिम बंगालचे नाव बदलण्याच्या हालचाली; ‘पश्चिम बंगा’ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडणार

घरात अनधिकृत प्रवेश करून कुटुंबाला बाहेर काढले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दिव्यांग मुलासह वृद्ध आई-वडिलांना धक्काबुक्की केल्याची तक्रार; सासवड पोलिसांकडून तपास सुरू

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

घरात अनधिकृत प्रवेश करून कुटुंबाला बाहेर काढले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दिव्यांग मुलासह वृद्ध आई-वडिलांना धक्काबुक्की केल्याची तक्रार; सासवड पोलिसांकडून तपास सुरू

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुरंदर तालुक्यातील मांढर-टोणपेवाडी येथे घरात अनधिकृत प्रवेश करून एका कुटुंबाला धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कुटुंबात दिव्यांग मुलगा आणि वयोवृद्ध आई-वडिलांचाही समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तेजसकुमार हरिभाऊ सुकल (वय ४०, मूळ रा. गट क्रमांक २४३, टोणपेवाडी, मांढर, ता. पुरंदर; सध्या रा. वडकी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, अरुण अण्णा ऊर्फ अनंता सुकल, प्रमिला अरुण सुकल, प्रदीप अरुण सुकल, कोमल रामचंद्र गोळे आणि प्रतीक अरुण सुकल (सर्व रा. मांढर, ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांढर-टोणपेवाडी गावाच्या हद्दीतील गट क्र. २४३ मधील ग्रामपंचायतीच्या जुन्या मिळकत क्र. ६९० आणि नवीन मिळकत क्र. ६९१ मधील दोन गुंठे जागेवर फिर्यादीचे घर आहे. सन २०२५ मध्ये आरोपींनी फिर्यादीच्या परवानगीशिवाय त्यांच्या मालकीच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी, त्यांची पत्नी, दिव्यांग मुलगा आणि वयोवृद्ध आई-वडिलांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या तक्रारीवरून सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper