मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडाभाजपकडून संघटन विस्ताराची रणनीती; ‘सेवादूत अभियाना’च्या प्रभावी अंमलबजावणीवर भररोहित पवारांना बावनकुळेंचा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवरून राजकीय वातावरण तापलेप्रत्येक जिल्ह्यात १००, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीदुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कारपालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन

पीएमपीएमएलमध्ये साजरा

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनिट वाचन

कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

पुणे : भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वतीने राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच जात, धर्म, भाषा, पंथ आणि प्रांताच्या आधारावर भेदभाव न करता सर्व भारतीयांमध्ये बंधुभाव वाढविणे, शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याची प्रतिज्ञा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.

सर्व मतभेद शांततामय आणि संवैधानिक मार्गाने सोडवून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर