इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन
पीएमपीएमएलमध्ये साजरा
1 મિનિટ વાંચન

पुणे : भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वतीने राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच जात, धर्म, भाषा, पंथ आणि प्रांताच्या आधारावर भेदभाव न करता सर्व भारतीयांमध्ये बंधुभाव वाढविणे, शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याची प्रतिज्ञा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.
सर्व मतभेद शांततामय आणि संवैधानिक मार्गाने सोडवून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

મહારાષ્ટ્ર મિરર
