मुंबईठाणे

Mumbai news : घाटकोपरमध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने 3.57 कोटींचा गंडा; भरघोस परताव्याच्या आमिषाने अनेक गुंतवणूकदार जाळ्यात!

Mumbai news : दरमहा 5 टक्के परताव्याचे दिले होते आश्वासन; पंतनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai news :मुंबई :- मुंबईतील घाटकोपर परिसरात शेअर बाजार आणि आयपीओमध्ये (IPO) गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 3 कोटी 57 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवत आणि नामांकित सिक्युरिटीज कंपनीच्या नावाचा गैरवापर करत आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. याप्रकरणी मुंबईच्या पंतनगर पोलीस ठाण्यात 5 आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दरमहा 5 टक्के परताव्याचे आमिष; सुरुवातीला विश्वास संपादन करून उकळल्या मोठ्या रकमा

पंतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय गृहिणी झारणा मितुल दाडिया आणि त्यांच्या कुटुंबाची 2 कोटी 77 लाख रुपयांची, तर 55 वर्षीय हितेन घनश्याम मेहता यांची 80 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींनी मुख्य मुद्दलावर दरमहा 5 टक्के खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीच्या काळात वेळेवर काही प्रमाणात परतावा देऊन आरोपींनी गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफ्याची लालच दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करून घेतली.

1.25 कोटींचा चेक अनादरित; चौकशीदरम्यान बनावट खात्यांचा आणि आंतरराष्ट्रीय कारणांचा पडदाफाश

जेव्हा गुंतवणूकदारांनी आपल्या रकमा परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपींनी युद्धाचे सावट आणि बाजारपेठेतील घसरणीचे कारण पुढे करत 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत मागून घेतली. मात्र, त्यानंतरही पैसे परत न मिळाल्यामुळे आणि आरोपींनी दिलेला 1 कोटी 25 लाख रुपयांचा धनादेश (Cheque) बँकेत वटला नसल्याने फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. आरोपींनी चेंबूर येथील एका बँकेत बनावट खाते उघडून पैसे उकळल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button