मुंबई
Trending

Dhananjay Munde : बंगल्याचा वाद चर्चेत; धनंजय मुंडेंनी 4.5 महिने बंगला रिकामा केला नाही, 42 लाखांचा दंड?

Dhananjay Munde Latest News : छगन भुजबळ निवासस्थानाच्या प्रतीक्षेत; ‘मी त्यांना कसं बाहेर काढणार’, भुजबळ यांची प्रतिक्रिया

मुंबई :- मंत्रिमंडळातील सहकारी नेत्यांमध्ये शासकीय बंगल्यावरून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन साडेचार महिने उलटले तरी, भाजप नेते धनंजय मुंडे यांनी अद्याप शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे उत्तराधिकारी मंत्री छगन भुजबळ यांना अजूनही बंगल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. या विलंबाबद्दल छगन भुजबळ यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसरीकडे मुंडे यांच्यावर 42 लाखांपर्यंत दंड आकारला गेल्याची माहिती समोर येत आहे.

धनंजय मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात नाव आल्यानंतर 4 मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नियमांनुसार, 15 दिवसांत त्यांना शासकीय निवासस्थान रिकामे करणे अपेक्षित होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. त्यांना सातपुडा बंगला अलॉट करण्यात आला, मात्र तो अद्याप रिकामा झालेला नाही.

या विषयावर बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. ते म्हणाले, “सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करते. त्यांनी मला पत्र देऊन बंगला दिला आहे, पण जर तिथे आधीच कोणी राहत असेल, तर मी त्यांना कसं बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहेत. मी अजून त्यांना एक शब्दही बोललेलो नाही.”

भुजबळ यांनी सांगितले की, “मी अजित पवारांशीही यावर बोललो नाही. जास्त गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरे एखादे छोटे-मोठे घर द्यावे. पण मी यावर जास्त चर्चा करणार नाही.” त्यांनी सामान शिफ्ट करायला मुदतवाढ मिळते, अन्यथा दंड भरावा लागतो, असेही सूचकपणे सांगितले.

राजीनामा देऊनही बंगला रिकामा न केल्याने नियमांनुसार धनंजय मुंडे यांना दंड आकारला जात आहे. साडेचार महिन्यांचा हा दंड आता 42 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणावरून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांमधील अंतर्गत कुरबुरी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button