Pune Crime News | भारती विद्यापीठ : मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; चार मोबाईल जप्त

तपास पथकाची कामगीरी
पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News, Maharashtra Mirror
कात्रज परिसरात पादचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या सराईत आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजता कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर बसस्टॉपजवळ फिर्यादी दूध आणण्यासाठी पायी जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यातून राहुल सिताराम निकम (वय २८, रा. लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महमदवाडी, कोंढवा) याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. वंडर सिटी रोड परिसरातून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत सुमारे १.३० लाख रुपये आहे.
या कारवाईत आरोपीचे इतर दोन साथीदार असल्याचेही तपासात समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडगे, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने केली.
पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून ‘चाचपणी’ https://www.instagram.com/p/DaK8Xf2DUE6


