Hotel Manager Bribe News : पंधरा हजाराची लाच स्वीकारताना, हॉटेल व्यवसायिकाला एसीबीने अटक केली, महावितरणाच्या लाईनमनच्या सांगण्यावरून केले कृत्य
Beed Anti Corruption Bureau Arrested Hotel Manager For Bribe : लाचलुजपत प्रतिबंधक विभाग, बीड यांची कारवाई ; लाईनमन, हॉटेल व्यवसाय चालक दोघांना एसीबीने केले अटक, नवीन विजेचा मीटर लावण्याकरिता मागितली होती लाच
बीड :- मंजिरी फाटा पाली, जिल्हा बीड Beed ACB Trap येथे तक्रारदार याचे व्यावसायिक शटर असून तेथील मीटर जळाल्याने तक्रारदार याने नवीन मीटर बसून देण्यासाठी महावितरणाला अर्ज केला होता. महावितरणाचा Mahavitrana Line लाईनमन नवीन मीटर बसवण्यासाठी वीज चोरीची अतिरिक्त दंड न लावण्याकरिता वीस हजार रुपयाची लाच मागितली होती. Beed Latest Anti Corruption Bureau Trap News
हॉटेलमध्ये लाच स्वीकारताना एसीबीची धाड
श्रीमंत जीवराज मुंडे , महावितरण लाईन मन यांनी नवीन मीटर लावण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपयाची लाच मागितली होती तडजोडीअंती पंधरा हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. खाजगी व्यक्ती सय्यद आयुब मोहम्मद (42 वर्ष) हॉटेल व्यवसायिकाला सदर रक्कम देण्याचे लाईनमन याने सांगितले होते. या सर्व घटनेची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांना माहिती देऊन तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे हॉटेल आयुब मिस्त्री, मंजिरी फाटा पाली येथे सापळा रचून आयुब याला पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. “Trendy Trouble: ACB Cracks Down on Hotel Business for Illegal Power Connections” सदर कृत्य हे लाईनमन यांच्या सांगण्यावरून केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. लाईनमन मुंडे यालाही अटक करून यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Beed Latest Anti Corruption Bureau Trap News
“Controversial and provocative: ACB uncovers hotel’s shady dealings with AC meters”
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,पर्यवेक्षण अधिकारी व सह सापळा अधिकारी – श्री.शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि.बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि .बीड. Beed Latest Anti Corruption Bureau Trap News
सापळा पथक – सुरेश सांगळे,अमोल खरसाडे, संतोष राठोड, श्रीराम गिराम , गणेश मेहेत्रे, सुदर्शन निकाळजे , ला. प्र. वि.बीड या पथकाने दोघांना अटक केली आहे.