धक्कादायक : कल्याणमध्ये भावाने भावाचा केला खून, निमित्त होत पाचशे रुपये

Kalyan Murder News : पाचशे रुपये चोरल्याच्या संशयावरून एका भावाने दुसऱ्या भावाची निर्घृण हत्या केली. आरोपी भावाचे पैसे चोरीला गेले होते, मात्र त्याचे पैसे मयताने घेतल्याचा संशय आहे. 500 रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी एका भावाने दुसऱ्याची चाकूने वार करून हत्या केली.
कल्याण :- पैसे चोरल्याच्या संशयावरून एका भावाने दुसऱ्या भावाची हत्या केली. Kalyan Murder News दोन भावांमध्ये 500 रुपयांवरून वाद सुरू होता, त्याचे रुपांतर रक्तरंजित झाले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. Kalyan Latest Crime News तसेच आरोपी भावाला 12 तासांत अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यापासून पीडित कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
कल्याणमध्ये पाचशे रुपयांसाठी भावाने दुसऱ्या भावाची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर आरोपी भाऊ घटनास्थळावरून पळून गेला. आरोपी हे तीन भाऊ सलीम शमीम खान, मयत नईम शमीम खान आणि आणखी एका भावासोबत कल्याण परिसरातील एका घरात राहत होते.घरात मुलांसह आईही राहत होती. हत्येच्या रात्री भाऊ नईम याने पाचशे रुपये चोरल्याचा संशय सलीमला होता.
दोघांमध्ये पैशांवरून बराच वेळ वाद सुरू होता. वाढत्या वादासोबतच सलीमचा रागही वाढत होता. वाद विकोपाला गेल्यानंतर सलीमने भाऊ नईम याचा किचनमध्ये ठेवलेल्या धारदार चाकूने खून करून घटनास्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.