महाराष्ट्र

Jalgone News : सोन्या-चांदीच्या दरात घसरणग्राहकांना दिलासा

Jalgone News :जळगाव : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असताना गुरुवारी (दि.२७) दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे तीन हजार रुपयांची घट झाली असून चांदीही स्वस्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर एक लाख त्रेसष्ठ हजार रुपयांवरून घसरून सुमारे एक लाख साठ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर दोन लाख पन्नास हजार रुपयांवरून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे. हे दर जीएसटीशिवाय असल्याचे सांगण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Jalgone News
महाराष्ट्रातील सोन्याचा भाव
28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता Goodreturns वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे कोल्हापूर, जळगाव तसेच इतर शहरांतील भाव खालीलप्रमाणे आहेत –
24 कॅरेट सोनं – 1,59,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 15,982 रुपये प्रति ग्रॅम
22 कॅरेट सोनं – 1,46,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14,650 रुपये प्रति ग्रॅम
18 कॅरेट सोनं – 1,19,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 11,987 रुपये प्रति ग्रॅम
1 तोळा कितीला?
वरती दिलेले दर हे मेकिंग चार्जेस आणि GST वगळता आहे. त्यामुळे यात मेकिंग चार्जेस म्हणजेच सोनाराचा खर्च आणि GST मिळविल्यास दागिन्यांसाठी वापरण्यात येणार 22 कॅरेट सोनं प्रति तोळा 1,69,002 रुपयांना विकलं जात आहे. तर 18 कॅरेट सोनं 1,38,282 रुपये प्रति तोळा आहे.दरम्यान, प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोनं 16,900 रुपये आणि 13,828 रुपयांना विकलं जात आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button