महाराष्ट्र

Katraj-Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाची मुदत पुन्हा लांबणीवर

Katraj-Kondhwa Road :प्रशासनाच्या वारंवार बदल्या जाणाऱ्या तारखांमुळे स्थानिकांमध्ये संताप; काम पूर्ण करण्यासाठी आता मार्च २०२७ ची नवी डेडलाईन

पुणे, महाराष्ट्र मिरर

Katraj-Kondhwa Road : पुणे शहरातील वाहतूककोंडीच्या प्रमुख समस्यांपैकी एक असलेल्या कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण प्रकल्पाला नव्याने डेडलाईन जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ‘कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण’ प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा रेंगाळले आहे. पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) जून अखेरपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. आता या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे दररोज वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा सामना करणाऱ्या हजारो वाहनचालक आणि रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. Katraj-Kondhwa Road

सुमारे ३.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे काम २०१७ पासून सुरू आहे. ८४ मीटरवरून ५० मीटरपर्यंत सुधारित करण्यात आलेल्या या रस्त्यासाठी १०९ मालमत्तांचे अधिग्रहण आवश्यक होते. पीएमसीच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८४ मालमत्तांचे संपादन झाले असून, अद्याप २५ मालमत्तांचे भूसंपादन प्रलंबित आहे. टीडीआर , एफएसआय संदर्भातील तांत्रिक अडचणी आणि काही मालमत्ता मालकांची रोख भरपाईची मागणी, या कारणांमुळे काम रखडल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Crime Newsपॅरोलवर सुटलेला फरार आरोपी ताब्यात

सध्याच्या पावसाळी दिवसांत या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर पडलेले खोल खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. सकाळच्या वेळी शालेय बसेस आणि नोकरीवर जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे.

“२०२१ पासून आम्ही रस्त्याच्या कामाचा त्रास सहन करत आहोत. दर काही महिन्यांनी आम्हाला नवीन मुदत दिली जाते, पण प्रत्यक्ष काम काहीच होत नाही.” तर रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे पादचाऱ्यांचे चालणेही कठीण झाले असून प्रशासनाने आश्वासने देण्यापेक्षा काम तातडीने पूर्ण करावे.” अशा शब्दात स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. Katraj-Kondhwa Road

Political / Crime News पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कडक उपाययोजना करा

एप्रिलपासून भूसंपादनाचे काम गतीने सुरू असल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी, रस्त्यावरील प्रत्यक्ष प्रगती नगण्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दक्षिण पुण्यातील कात्रज, कोंढवा, खाडी मशीन चौक, उंद्री, मोहम्मदवाडी आणि एनआयबीएम परिसरांना जोडणारा हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने कणा आहे. मात्र, या कॉरिडॉरमध्ये झालेल्या प्रचंड नागरीकरणानंतरही रस्ते सुविधांची अवस्था ‘जैसे थे’ असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. आता मार्च २०२७ ची दिलेली नवी मुदत प्रशासन पाळणार का, की पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Katraj-Kondhwa Road

Pune : मनपाच्या अंगणातच झाडांची घुसमट; वृक्षप्रेमींनी स्वतःहून काढले डांबर आणि काँक्रिट

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button