मुंबईठाणे
Trending

Sanjay Jadhav : काँग्रेसला ‘बदलापूर’मध्ये हादरा! शहराध्यक्ष संजय जाधव शेकडो कार्यकर्त्यांसह थेट शिंदे गटात

Congress Sanjay Jadhav Joined Shivsena Shinde Group : महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाणे-रायगड पट्ट्यात ‘धनुष्यबाण’ची मोठी ताकद वाढली; एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला खिंडार पाडले

मुंबई :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव Sanjay Jadhav यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे.

बदलापूर हा ठाणे-रायगड जिल्ह्याला लागून असलेला महत्त्वाचा भाग मानला जातो. याच भागात काँग्रेसचा बालेकिल्ला कमकुवत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या उपस्थितीत संजय जाधव आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, शिंदे गटाची ताकद या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, महायुतीमध्ये भाजपच्या वाढत्या ‘इनकमिंग’मुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. या नाराजीनंतरही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला खिंडार पाडत आपला राजकीय दबदबा कायम ठेवल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button