मुंबई

Mumbai Local Accident : मुंबई लोकलचा भीषण अपघात: पुष्पक एक्स्प्रेसला घासून 5 प्रवाशांचा मृत्यू!

•Mumbai Local And Pushpak Train Accident : दिवा–मुंब्रा दरम्यान घडली दुर्घटना,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या दारात उभे असलेले प्रवासी थेट रूळावर पडून मृत्यू

ठाणे :- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सकाळच्या गर्दीच्या वेळेस मुंबईतील लोकल सेवेवर मोठा धक्का बसला आहे. मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलने आणि दुसऱ्या पटरीवरून जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान जोरदार घासले. या भीषण धडकेत लोकलच्या दरवाज्याशी लटकलेल्या सुमारे 8 ते 10 प्रवासी धावत्या गाडीतून थेट पटरीवर फेकले गेले.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. दुर्घटना सकाळी 9 ते 9.15 च्या सुमारास घडली, जेव्हा गर्दी शिगेला पोहोचलेली असते.

हादरलेले मुंबईकर आणि अपुऱ्या लोकल फेऱ्यांमुळे नागरिक ‘मिळेल ती ट्रेन’ पकडत असतात, याचा गंभीर परिणाम आज पाहायला मिळाला. अपघातानंतर काही काळासाठी या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, प्रथमदर्शनी ट्रॅक मॅनेजमेंट आणि सिग्नल यंत्रणेतील चूक समोर येत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button