Mumbai news : दिल्लीतील सीजेपी आंदोलनात ‘नकली पोलीस’ उतरवले; खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर धक्कादायक आरोप!
Mumbai news : खाकी गणवेशाने भरलेल्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर घणाघात; भाडोत्री गुंडांना पोलिसांची वर्दी दिल्याचा दावा
Mumbai news मुंबई :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी आणि आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी चक्क ‘नकली पोलीस’ मैदानात उतरवण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला असून, या व्हिडिओमुळे दिल्लीसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
‘ज्यांनी महिलांवर हात टाकले ते अमित शाह यांचे नकली पोलीस : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “ज्या पोलिसांना रस्त्यावर गुंडागर्दी करताना पाहिले आणि आंदोलनातील महिला व मुलींवर हात टाकताना पाहिले, ते मूळ पोलीस नसून भाजपचे (अमित शाह) ‘नकली पोलीस’ होते. भाडोत्री गुंडांना पोलिसांचा खाकी गणवेश देऊन आंदोलकांना रोखण्यासाठी मुद्दाम मैदानात उतरवण्यात आले होते.” पुढे बोलताना त्यांनी, “नेमप्लेट शिवाय जे पोलीस रस्त्यावर वावरत होते, ते प्रत्यक्षात वर्दी घातलेले गुंडच होते. हाच राष्ट्रीय सुरक्षेचा ‘गुजरात पॅटर्न’ आहे, जनतेने डोळे उघडून हे नीट पाहिले पाहिजे,” असे थेट आवाहन केले आहे.
पोलिसांच्या युनिफॉर्मने भरलेली गाडी कॅमेऱ्यात कैद; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये एका चारचाकी वाहनाचा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये खाकी रंगाचे गणवेश आणि शर्ट्सचे भलेमोठे बंडल रचून ठेवल्याचे स्पष्ट दिसत आहे. आंदोलनाच्या परिसरातच पोलिसांच्या वर्दीने गच्च भरलेल्या गाड्या कशासाठी उभ्या होत्या, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या धक्कादायक खुलाशामुळे आंदोलनादरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ओळखीवर आणि एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
