मुंबई

Mumbai News : तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे ट्विंकल खन्नाकडून कौतुक

Mumbai News: भेसळयुक्त खाद्यपदार्थांवरील कारवाईची घेतली दखल


MumbaI news मुंबई : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक आणि कठोर कारवाईची अभिनेत्री व लेखिका ट्विंकल खन्ना हिने आपल्या खास मिश्किल शैलीत दखल घेतली आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि बनावट उत्पादनांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा संदर्भ देत ट्विंकलने आपल्या स्तंभलेखातून मुंढे यांच्या कामाचे विनोदी पद्धतीने कौतुक केले.https://maharashtramirror.com/
जत्रेत मिळणाऱ्या ‘बुढ्ढी के बाल’ अर्थात कॉटन कँडीच्या गुलाबी रंगावरही तिने मिश्किल भाष्य केले. कॉटन कँडीला गुलाबी रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांवर प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचा संदर्भ घेत, ‘कॉटन कँडीचा गुलाबी रंग गायब होण्यामागे मुंढेंचा हात आहे,’ अशा आशयाची टिप्पणी तिने केली. त्यांच्या कारवाईमुळे अनेक बड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्येही धाक निर्माण झाल्याचे तिने नमूद केले.
ट्विंकलने एका रेस्टॉरंटमधील आपला अनुभवही सांगितला. तेथे गेल्यानंतर तिने वेटरला थेट, “मुंढेंनी हे हॉटेल तपासले आहे का?” असा प्रश्न विचारला. वेटरने होकार दिल्यानंतरच तिने निर्धास्तपणे पनीर टिक्का ऑर्डर केल्याचे तिने विनोदी शैलीत लिहिले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
बाजारातील भेसळयुक्त आणि बनावट पनीरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ट्विंकल आणि तिची आई अभिनेत्री डिंपल कापडिया यांनी बाहेरून पनीर मागवणे बंद करून घरीच पनीर बनवण्यास सुरुवात केल्याचेही तिने सांगितले. दूध आणि तयार झालेल्या पनीरच्या प्रमाणावरून माय-लेकींमध्ये मजेशीर वाद होत असल्याचेही ट्विंकलने नमूद केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
इतकेच नव्हे, तर मुंढेंच्या कारवाईने प्रेरित होऊन तिने स्वतःच्या स्वयंपाकघराची ‘तपासणी’ केली. त्यावेळी तिला कालबाह्य मसाल्याचे पाकीट सापडल्याचा किस्साही तिने मिश्किलपणे मांडला. ट्विंकलची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून, मुंढेंच्या कारवाईची वेगळ्या अंदाजात दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button