मुंबई
Trending

CM Eknath Shinde Visit Lalbaghcha Raja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागचा राजा चरणी नतमस्तक

CM Eknath Shinde And Ajit Pawar At Lalbagcha Raja : उपमुख्यमंत्री अजित पवार आज ‘लालबागचा राजा’ चरणी लीन; भल्या पहाटे घेतलं दर्शन

मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी लालबागचा राजा चरणी नतमस्तक झाले आहे.बाप्पाच्या विसर्जनाला अवघे काही तास उरले असताना अजित पवार हे लालबागचा राजा चरणी नतमस्तक झाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागचा राजा चरणी नतमस्तक झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन मनोभावे आरती देखील त्यांनी केली आहे. तसेच राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव. राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत, असे मागणे त्यांनी गणेशाच्या चरणी मागितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. लालबागच्या चरणी नतमस्तक होताना त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रार्थना केली. अजित पवार म्हणाले, सध्या सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे एक दिवस पुण्याला गेलो होतो. एक दिवस बारामतीला दर्शनासाठी गेलो होतो. आज मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायक दर्शन घ्यायला आलो.

अजित पवार म्हणाले, माझा नेहमी कटाक्ष असतो. गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंग डे असल्यामुळे गर्दी नाहीये. बाप्पाकडे काही मागितले नाही. राज्यात सुख, समाधान-शांती लाभो आणि सर्वांची भरभराट होऊ दे, अशी मागणी त्यांनी बाप्पाकडे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0