मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सोन्याचे दर वाढू शकतात, पण मेकिंग चार्जेस आपोआप का वाढावेत?शासनाची २८ पदांची भरती योजना बारगळली; नोंदणी विभागाच्या २३ जागा अद्यापही रिक्तनेपाळमधील पहिल्या सौराहा ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंची नेत्र दीपक कामगिरी.५० लाख देऊनही मॅरेथॉन पत्रिकेतून महापालिकेचे नाव आणि लोगो गायब१३ वर्षे जुने प्रकरण, पण शिक्षा नाही३१ हजार फुटांवर १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला; पुणे विमानतळावर इमर्जन्सी

Pune News : ‘फॉलोअर्स’साठी वाहनचालकाकडून वाहतूकीचे नियम धाब्यावर ; भररस्त्यात फॉर्च्युनर आडवी लावून रिल

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड: सोशल मीडियावर ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ मिळवण्याच्या नादात वाहनचालकाकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘फॉलोअर्स’साठी वाहनचालकाकडून वाहतूकीचे नियम धाब्यावर ; भररस्त्यात फॉर्च्युनर आडवी लावून रिल
‘फॉलोअर्स’साठी वाहनचालकाकडून वाहतूकीचे नियम धाब्यावर ; भररस्त्यात फॉर्च्युनर आडवी लावून रिल

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड: सोशल मीडियावर ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ मिळवण्याच्या नादात वाहनचालकाकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना ताजी असतानाच, आता चाकण एमआयडीसी परिसरात एका फॉर्च्युनर कार चालकाने भररस्त्यात गाडी आडवी लावून रील बनवत मोठी वाहतूक कोंडी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

काही दिवसांपूर्वीच बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गावर नव्या कारची रील बनवण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी गाडी थांबवून वाहतूक कोंडी करण्यात आली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली असतानाच, आता चाकण एमआयडीसीच्या गजबजलेल्या रस्त्यावर फॉर्च्युनर कारचालकाने आपली गाडी रस्त्याच्या मधोमध आडवी उभी केली. या धक्कादायक स्टंटमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.https://maharashtramirror.com/ Pune News

यापूर्वी बावधन पोलिसांनी अशाच एका प्रकरणात गाड्या जप्त करून कारवाईचा बडगा उचलला होता. आता या प्रकरणात पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक पोलीस आणि चाकण पोलीस संबंधित फॉर्च्युनर चालकाचा शोध घेऊन काय कायदेशीर कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

संबंधित फॉर्च्युनर कारचालकाने महामार्गावर रील शूट करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. औद्योगिक पट्टा असलेल्या चाकण परिसरामध्ये दररोज अवडंबरी वाहनांची आणि कामगारांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी अशा प्रकारे स्टंटबाजी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper