
Eknath Shinde Latest News : विकासाच्या कामात कोणताही स्पीड बेकार राहणार नाही एकनाथ शिंदे यांची ग्वाही
ठाणे :- महाराष्ट्र दिन Maharashtra Din आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी ठाण्यातील शाखेत पोलीस मैदान येथे उपस्थित राहून ध्वजवंदन केले आहे. त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमात घोषणा केली की विकास कामात कोणताही स्पीडबेकार येणार नाही अशी ग्वाही दिली आहे.



तसेच राज्याच्या जडणघडणीत ज्या ज्ञात अज्ञात शहिदांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना विनम्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन केले. महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे पोलिसांच्या वतीने विशेष मानवंदना देण्यात आली. तसेच यावेळी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शिंदे यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला.
महायुती सरकारच्या माध्यमातून आज राज्याने चौफेर आघाडी घेतली असून विकासकामात कोणतेही स्पीडबेकर राहणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात मेट्रो, बुलेट ट्रेन, फ्लायओव्हर, रस्ते अशी अनेक विकासकामे सुरू असून येत्या दहा वर्षात या जिल्ह्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला आपल्याला दिसेल. एक विकसित जिल्हा म्हणून राज्याच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक योगदान ठाणे जिल्हा आणि एमएमआर क्षेत्राचे राहील असा विश्वास याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषद सीईओ रोहन घुगे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे तसेच ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच ठाणेकर नागरिक उपस्थित होते.
