मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Mumbai News : मतदारसंघ पुनर्रचना व महिला आरक्षण विधेयकावरून देशभरात खळबळ; विशेष अधिवेशन आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरूDelhi news : डिलिमिटेशन विधेयकावरून पंतप्रधान मोदींचे सूचक ट्वीट; महिला आरक्षणावर ठाम भूमिका मांडत विरोधकांवर निशाणाMumbai News : मविआत मोठी ठिणगी; ‘आम्ही त्या जागा लढणार, कसे जिंकताय बघतो’, संजय राऊतांचे खासदार अमोल कोल्हेंना थेट आव्हानMumbai News : लोकमान्य मेडिकल फाउंडेशनला मोठा दिलासा! PCMC ची ३७ वर्षांची कायदेशीर लढाई संपुष्टात; मालमत्ता करमाफी उच्च न्यायालयाकडून कायमदिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविरोधी पथकाची कारवाई; दोन जणांना ताब्यातMallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोप

Ajit Pawar Death : धक्कादायक! बारामतीत विमान कोसळले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन

•लँडिंग दरम्यान विमानाला भीषण आग; 'दादा' पर्वाचा अकाली अस्त, महाराष्ट्र शोकसागरात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar Death : धक्कादायक! बारामतीत विमान कोसळले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन

•लँडिंग दरम्यान विमानाला भीषण आग; 'दादा' पर्वाचा अकाली अस्त, महाराष्ट्र शोकसागरात

बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वय) यांचे आज (28 जानेवारी 2026) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत असताना सकाळी 8.45 च्या सुमारास त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

नेमकी घटना काय?

अजित पवार हे आज बारामतीमध्ये चार प्रचार सभांसाठी मुंबईहून खासगी विमानाने (Learjet 45) निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या तयारीत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच काही अंतरावर असलेल्या शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की विमानाचा अक्षरशः कोळसा झाला.
मदतीसाठी धाव, पण काळाचा घाला
विमान कोसळल्यानंतर स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले. अजित पवार यांना अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर काढून बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, विमानात असलेले दोन वैमानिक, एक अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक यांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा शेवट झाला आहे. साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहिलेले अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रशासकीय शिस्तीसाठी ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ते प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण बारामतीसह राज्यात शोककळा पसरली असून सर्व राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

शेअर करा