मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Mumbai News : मतदारसंघ पुनर्रचना व महिला आरक्षण विधेयकावरून देशभरात खळबळ; विशेष अधिवेशन आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरूDelhi news : डिलिमिटेशन विधेयकावरून पंतप्रधान मोदींचे सूचक ट्वीट; महिला आरक्षणावर ठाम भूमिका मांडत विरोधकांवर निशाणाMumbai News : मविआत मोठी ठिणगी; ‘आम्ही त्या जागा लढणार, कसे जिंकताय बघतो’, संजय राऊतांचे खासदार अमोल कोल्हेंना थेट आव्हानMumbai News : लोकमान्य मेडिकल फाउंडेशनला मोठा दिलासा! PCMC ची ३७ वर्षांची कायदेशीर लढाई संपुष्टात; मालमत्ता करमाफी उच्च न्यायालयाकडून कायमदिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविरोधी पथकाची कारवाई; दोन जणांना ताब्यातMallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोप

Mumbai Crime : गोवंडीत 22.80 लाखांचे मेफेड्रोन जप्त; अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटची दोघांना अटक

Mumbai Crime : शिवाजीनगर परिसरात 28 नोव्हेंबर रोजी धडक कारवाई; 76 ग्रॅम ‘एमडी’ हस्तगत, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

गोवंडीत 22.80 लाखांचे मेफेड्रोन जप्त
अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटची दोघांना अटक

Mumbai Crime : मुंबई :- गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) घाटकोपर युनिटने अटक केली आहे. 28 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत 76 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, या मुद्देमालाची किंमत 22 लाख 80 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गस्तीदरम्यान संशयित ताब्यात; झडतीत 76 ग्रॅम मेफेड्रोन सापडले

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटचे पथक परिसरात गस्त घालत असताना गोवंडीतील शिवाजीनगर भागात कोकण बँकेजवळील गल्लीमध्ये, अलका इंग्लिश शाळेजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना आढळली. हा व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 76 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले.

साथीदाराचा शोध घेत दुसऱ्यालाही बेड्या; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, शिवाजीनगर परिसरातील त्याच्या साथीदाराकडून त्याने हे अंमली पदार्थ मिळवल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरात मेफेड्रोनची विक्री करीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अमली पदार्थ व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS), 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींचा या जाळ्यातील सहभाग आणि इतर संबंधांबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper